कृष्णेची सर्वांगिण प्रगती कौतुकास्पद : विकास देशमुख

व्ही. एस. आय. संचालक व शास्त्रज्ञ शिष्टमंडळाची कारखान्यास सदिच्छा भेट

कराड – राज्यातील साखर कारखानदारीत यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे योगदान महत्वाचे असून सहकारी साखर कारखानदारीला कृष्णा कारखाना दिशादर्शक आहे. कारखान्याची होत असलेली सर्वांगिण प्रगती ही कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे येथील कृषी व तंत्रज्ञान संचालक व निवृत सनदी अधिकारी विकास देशमुख यांनी केले.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे, शास्त्रज्ञ डॉ. जुगल रेपाळे, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र भोईटे यांच्या शिष्टमंडळाने कारखाना कार्यस्थळ, कारखान्याचा जीवाणू खत प्रकल्प, कारखाना संचलीत जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयास भेट दिली. तसेच कारखान्याचे जयवंत आदर्श कृषी योजनेअंतर्गत सहभागी सभासद व प्रगतशील शेतकरी संतोष शिंदे यांचे बोरगांव येथील व्ही. एस. आय. 8005 ऊस क्षेत्रास भेट देवून ऊसपिकाची पाहणी केली. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले.

यावेळी गेली तीन वर्षापासून कारखाना राबवित असलेल्या सभासद हिताच्या योजनांची माहिती, जयवंत आदर्श कृषि योजनेअर्तंगत जीवाणू खत प्रकल्प उभारणी व एकरी 100 टन उत्पादन वाढ योजनेची माहिती या शिष्टमंडळास दिली. यावेळी व्हाईस चेअरमन जगदिश जगताप, माजी व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील, जितेंद्र पाटील, दयानंद पाटील, संजय पाटील, पांडुरंग होनमाने, अमोल गुरव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, ब्रिजराज मोहिते, गिरीश पाटील, सुजित मोरे, शिवाजीराव जाधव, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, मनोज पाटील, प्रमोद शिंदे, सर्व अधिकारी व शेतकरी सभासद उपस्थित होते.

विकास देशमुख यांनी ऊस लागण हंगामाबाबत आडसाली ऊस लागण न करीता जून-जुलै महिन्यामध्ये हिरवळीची पिके घेऊन पुर्व हंगामी व सुरु हंगामामध्ये ऊस लागण करण्याचे अवाहन केले. तसेच पाणी व खतांची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन काळाची गरज असल्याचे सुचित करत कारखान्याच्या विविध प्रकल्पांच्या भेटीनंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.

कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, जीवाणू खत प्रकल्प अधिकारी डॉ. विजय कुंभार, आदीसह सर्व अधिकारी, सभासद उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)