“कृष्णा’, “सह्याद्री’वर “बळीराजा’चे ढोल बजाओ आंदोलन

कराड – साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु होऊन दोन महिने उलटले तरी देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले मिळालेली नाहीत. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली “कृष्णा’, “सह्याद्री’ साखर कारखाना स्थळांवर “ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले.

यावेळी एकर कमी एफ. आर. पी. रक्कमेची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. बी. जी. पाटील म्हणाले, सरकार आणि कारखानदार शेतकऱ्यांची फसवणूक करीत असून शेतकरी येत्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. शासन निर्णयानुसार गळीत केलेल्या ऊसाचे बिल 14 दिवसांच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा करणे कारखान्यांना बंधनकारक आहे. तरी देखील कारखानदारांनी बिले जमा केलेली नाहीत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून झोपी गेलेल्या साखर कारखानदारांना जागे करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले, कारखानदारांच्या बिले न देण्याच्या धोरणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. त्यांच्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. तरी यामध्ये सरकारने तोडगा काढून तसेच कारखान्यांनी त्वरित ऊस बिले एकर कमी विनाकपात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असून त्यास शासन जबाबदार राहणार आहे. यावेळी शेतकऱ्यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार व कारखानदारांविरोधात “कृष्णा’, “सह्याद्री’ साखर कारखाना स्थळांवर “ढोल बजाओ’ आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)