कृष्णा-वेण्णा नदीत स्थानिक गणपतींचे होणार विसर्जन

सातारा – येथील संगम माहुली परिसरात असलेल्या कृष्णा-वेण्णा नदीमध्ये केवळ स्थानिक गणपतींचेच विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश माने यांनी दिली.

नदीमध्य सातारा शहरातील व शेजारच्या गावातील लोक गणपती विसर्जन करण्यासाठी येत असतात.तसेच या वर्षी पोवईनाका येथे रस्ताचे काम चालू असल्याने वाहतुक बंद राहणार आहे. परिणामी सर्व घरगुती गणपती व सार्वजनिक मंडळे ही संगम माहुली नदीत गणपती विसर्जन करण्यासाठी येवू शकतात. तसेच सातारा नगरपालिका, खेड, खिंडवाडी, देगाव, कोडोली, विलासपूर, शाहूपुरी या ग्रामपंचायत विभागातून हजारो लोक संगम माहुलीत गणपती विसर्जन करण्यासाठी येत असतात. त्यामुळे संगम माहुली नदी काठी मोठ्या प्रमाणावर कचरा होतो.

तसेच गाड्या पार्किंगचा त्रास गावातील लोकाना होतो. त्यामुळे सातारा नगरपालिकेने लंक्ष घालून सातारा शहरातील व शेजारच्या भागातील लोकांना चांगल्या सुविधा देण्यात यावी असे ही सांगण्यात आले. सातारा नगरपालिका ही शहरात गणपती विसर्जनासाठी लाखो रूपये खर्च करते पण संगम माहुलीसाठी कुठलाही निधी व सुविधा देत नाही.तरी नगराध्यक्षनी या कार्यासाठी जास्तीत जास्त निधी व सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी संगम माहुलीचे संरपच व सर्व ग्रामस्थांची केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)