कृष्णा वजनकाटा ठरला “धर्मकाटा’

कराड – यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा वजनकाटा आपल्या अचूकतेमुळे नेहमीच “धर्मकाटा’ म्हणून ओळखला जातो. शासकीय भरारी पथकाने नुकतीच कारखान्याच्या वजन काट्याची पाहणी केली. त्यावेळी विविध निकषांच्या आधारे केलेल्या वजनावेळी प्रत्येकवेळी कृष्णा कारखान्याचा वजनकाटा अचूक असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे कृष्णाच्या वजनकाट्याने “धर्मकाटा’ ही ओळख अबाधित राखली आहे.

नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे, ल. उ. कुटे, गोपाळ वसु, राठोड, विश्वास जाधव, गणेश शेवाळे, अशोक लोहार यांनी कारखाना कार्यस्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रमाणित वजनाने तपासणी करण्यात आली. तसेच ऊसाने भरलेल्या गाड्यांचे प्रत्यक्ष वजन करून, गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या फेरवजन करण्यासाठी परत इलेक्‍ट्रॉनिक वे ब्रीजवर बोलवण्यात आल्या. या चाचणीवेळी अचूक वजन नोंदविण्यात येत असल्याचे या समितीला दिसून आले.

तसेच वजनकाट्याबाहेर लावलेल्या मोठ्या डिस्प्लेवर भरलेल्या गाड्यांचे व रिकाम्या गाड्यांचे वजन अचूकपणे होत असल्याचे निदर्शनास आल्याने कृष्णा कारखान्याचा वजनकाटा निर्दोष व अचूक असल्याचा शेरा पथकाने दिला आहे.
यावेळी कारखान्याचे प्रकाश सुर्यवंशी, अवधुत रेणावीकर, विजय मोहिते, ए. डी. पाटील, जी. बी. मोहिते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)