कृष्णा मॅरेथॉनच्या माध्यमातून 2000 स्पर्धकांनी दिला निरोगी आरोग्यासाठी धावण्याचा संदेश

कराड : कृष्णा अभिमत विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटलच्यावतीने आयोजित कृष्णा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक

कराड, दि. 24 (प्रतिनिधी) – येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठ आणि कृष्णा हॉस्पिटल यांच्यावतीने सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त आयोजित कृष्णा मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद लाभला. सुमारे दोन हजारहून अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेत निरोगी आरोग्यासाठी धावण्याचा संदेश दिला.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या हस्ते आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व कृष्णा औद्योगिक महिला संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वज दाखवून सकाळी सहा वाजता कृष्णा रूग्णालयाच्या प्रांगणातून मॅरेथॉनला प्रारंभ झाला. या मॅरेथॉनमध्ये कृष्णा परिवारातील विविध संस्थांमधील विद्यार्थी, प्राध्यापक डॉक्‍टरांसह सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी येथील दोन हजारहून अधिक नागरिक सहभागी झाले होते.
पाच किमी अंतराच्या पुरूषांच्या 16 ते 35 वयोगटात शुभम पाटील, विघ्नेश सावंत, स्वप्नील जगदाळे यांनी तर महिला गटात निलम जाधव, आर्या आगरकर व प्राजू पवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच पुरूषांच्या 35 वर्षावरील गटात मारुती चाळके, शिवलिंग राजमाने, किरण पवेकर यांनी तर महिलांच्या गटात अलका राजमाने, सुनिता निंबाळकर व वैशाली चव्हाण यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला.
दहा किमी अंतराच्या पुरूषांच्या 16 ते 35 वयोगटात अक्षय आलांदे, सागर बिंद्रे, विकास जाधव यांनी तर महिला गटात सिमोन फ्रान्सिस्को, जिन चोन्ग व अकमाल बिंत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच पुरुषांच्या 35 वर्षावरील गटात सुनिल शिवणे, अशोक अमाणे, शंकर सुतार तर महिलांच्या गटात उषा पाटील, सुनंदा शेळके व निर्मला काळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला.
21 किमी अंतराच्या पुरूषांच्या 16 ते 35 वयोगटात स्वप्नील सावंत, सैनी विनोद कुमार, अविनाश दोडमनी यांनी; महिला गटात सुजन शेख, रितू उनउणे व नोनिका जाजू यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच पुरुषांच्या 35 वर्षावरील गटात परशराम लक्ष्मण, तानाजी चौगले, मल्लिकार्जुन पारडे; तर महिला गटात शोभा देसाई, दीपाली यादव व शोभा पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना भाजपाचे सांगली जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ. सुरेश भोसले, उत्तरा भोसले, गौरवी भोसले, प्राचार्य एस. टी. मोहिते, डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील यांच्यासह विविध संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)