कृष्णा बॅंकेचा आर्थिक व्यवस्थापनाबाबत गौरव

कराड – कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णा सहकारी बॅंकेला सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाबद्दल कोल्हापूर येथील कर्नाड बॅंकिंग रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट फौंडेशनकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सातारा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते कोल्हापूर येथे कृष्णा बॅंकेच्या संचालकांनी व पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला.

कोल्हापूरातील कर्नाड बॅंकिंग रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट फौंडेशनने राज्यातील 250 ते 500 कोटी रूपयांपर्यंत व्यवसाय करणाऱ्या नागरी सहकारी बॅंकांची पाहणी करून, या व्यवसाय विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी आणि सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन करणारी बॅंक म्हणून कृष्णा बॅंकेची निवड या पुरस्कारासाठी केली. दामाजी मोरे, शिवाजीराव थोरात, नामदेवराव कदम, ऍड. विजयकुमार पाटील, जी. बी. वाटेगावकर, भगवान जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी महाराष्ट्र अर्बन बॅंक्‍स फेडरेशनचे विद्याधर अनास्कर, दिनेश ओऊळकर, किरण कर्नाड, माधवी कर्नाड उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)