कृष्णा कारखान्याच्या तोडणी यंत्रणेसाठी दहा हार्वेस्टर सज्ज

डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पूजन; आणखी तीन यंत्रे होणार दाखल

कराड –
रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या तोडणी यंत्रणेत यावर्षी नवीन चार हार्वेस्टर मशिन दाखल झाले आहेत. यामुळे कारखान्याची तोडणी यंत्रणा गतिमान होणार आहे. या मशिनचे पूजन व कृष्णा कृषि संघाने तयार केलेल्या नवीन अंगद बांधणीचे पूजन कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील, संचालक धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, दिलीपराव पाटील, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, कृष्णा बॅंकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, संजय गांधी निराधार योजनेचे कराड तालुकाध्यक्ष संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. भोसले म्हणाले, संचालक मंडळाने शेतकरी सभासदांना अधिकाधिक सेवासुविधा पुरविण्यासाठी, ऊसतोड मजूरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कृष्णा बॅंकेच्या सहकार्यातून गतवर्षीपर्यंत कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी एकत्रीत येवून सहा हार्वेस्टर मशिन घेतलेली आहेत. यात वाढ होवून यावर्षी तोडणी यंत्रणेत नवीन चार हार्वेस्टर मशिन दाखल झालेली आहेत. येत्या काही दिवसात आणखी नवीन तीन तोडणी मशीन कारखान्याच्या तोडणी यंत्रणेत दाखल होणार आहेत.

या यंत्राच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना व्यवसायाची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. कार्यक्रमास बहेचे उपसरपंच मनोज पाटील, कृष्णा कृषि संघाचे चेअरमन शशिकांत पाटील, व्हाईस चेअरमन संदीप यादव, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, कृष्णा बॅंकेचे शाखाधिकारी डी. डी. पाटील, दादासो सोमदे, धनाजी देसाई, अमरसिंह जाधव, महादेव जगताप, अनिल जगताप, अमृत शिंदे, सचिन देसाई, नितीन पाटील, जयवंत पाटील, संभाजी पवार, सुरेश साळुंखे, अनिल पवार आदीसह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)