कृष्णानगर भाजी मंडईची दूर्दशा

पिंपरी – कृष्णानगर येथील भाजी मंडईच्या छताच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यातील सध्याच्या गाळ्यांचा आकारही खुप छोटा आहे. त्यामुळे सध्याच्या पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये व्यापाऱ्यांना मोठ्‌या अडचणींना तोंड द्यावे लागत असुन त्यांचे हाल होत आहेत. त्याचबरोबर व्यापाऱ्यांना गाळ्यांचा ताबाही दिला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना त्वरीत गाळे द्यावेत व गाळ्यांची जागा वाढवावी, अशी मागणी येथील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांनी महापौरांकडे केली आहे.

कृष्णानगर येथील भाजी मंडईचे काम अपुरे राहिले आहे. येथील गाळ्यांची दुरुस्ती करुन त्वरीत वाटप करणे गरजेचे आहे. मात्र, अद्यापही ते वाटप झालेले नाही. दहा ते बारा वर्षापासुन काम रखडले आहे. या भाजी मंडईतील गाळे चार बाय सहाचे आहेत. त्यामुळे ते खूप लहान होत आहेत. यामध्ये व्यापाऱ्यांना पुरेसे साहित्यही ठेवता येत नाही. या गाळ्यांचा आकार वाढवुन दहा बाय दहाचे गाळे तयार करावेत, अशी मागणी येथील व्यापारी करीत आहेत.

गाळ्यांसाठी सध्या तीन ते साडेतीन हजार रुपये भाडे द्यावे लागत आहे. मात्र गाळ्यांमध्ये बसणारे साहित्य कमी आहे. व्यापाऱ्यांना फायदा देखील होत नाही. महापालिकेने ठरवुन दिलेले भाड्याचे दर हे परवडणारे नाहित त्यामुळे ते दर कमी करावते अशी मागणी देखील व्यापारी करत आहेत. दरम्यान भाजी मंडईच्या समस्यांबाबत मोतीराम जोगदंड, काळुराम नेवाळे, शिवराम जोगदंड, आदींनी महापौरांची भेट घेतली. या भेटीत भाजी मंडई तातडीने दुुरुस्त करुन गाळे वाटप करावे अशा मागणीचे निवेदन महापौरांना देण्यात आले. यावर आम्ही स्वतः मंडईत येवुन पाहणी करुन तात्काळ निर्णय घेवु असे आश्‍वासन महापौर नितीन काळजे यांनी दिले असल्याचे जोगदंड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)