कृष्णाचे 46 सभासद ज्ञानयाग प्रशिक्षणासाठी रवाना

कराड – य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 46 शेतकरी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट पुणे यांच्यावतीने आयोजित ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. दरवर्षी शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ऊसाचे प्रतिएकरी उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट तर्फे प्रशिक्षण दिले जाते. शिबीरात सहभागी होण्याची संधी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने

कार्यक्षेत्रातील 46 शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिली आहे. पाच दिवसीय प्रशिक्षण शिबीरात सांगली, सातारा, मराठवाडा व खानदेश मधील शेकडो शेतकरी सहभागी होत असतात. कृष्णा कारखान्याकडून शिबीरात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा संपूर्ण खर्च कारखान्याच्या वतीने करण्यात येणार आहे. प्रशिक्षण शिबीरात माती परिक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत.

-Ads-

प्रशिक्षणात ऊस शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. चेअरमन डॉ. सुरेश भोसले, संचालक दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, दिलीपराव पाटील, पांडुरंग होनमाने, गिरीष पाटील, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, कृष्णा कामगार सोसायटीचे अध्यक्ष पैलवान आनंदराव मोहिते, बहेचे उपसरपंच मनोज पाटील यांनी सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी सेक्रेटेरी मुकेश पवार, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, लेबर वेल्फेअर ऑफिसर अरुण पाटील, सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, जलसिंचन अधिकारी आर. जे. पाटील, कार्यालयीन अधीक्षक अनिल पवार, अजय दुपटे, डॉ. विजय कुंभार, संरक्षण अधिकारी संपतराव पाटील व शेतकरी सभासद उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)