कृष्णराव भेगडे शाळेत विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

तळेगाव दाभाडे – येथील तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे मंगळवारी (दि. 22) शाळेच्या “कृष्णाई’ सभागृहामध्ये आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी मायमर मेडिकल कॉलेजमधील सर्व तज्ज्ञ डॉक्‍टरांना आमंत्रित करण्यात आले होते.

त्यामध्ये डॉ. दिलीप भोगे, डॉ. अनंत परांजपे आणि परांजपे, मावळ डॉक्‍टर्स असोशिएनचे अध्यक्ष डॉ. अजय ढाकेफळकर, डॉ. जातेगावकर, डॉ. बेदरकर, डॉ. शिंदे, डॉ. धनवट आणि अन्य तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी शिबिर आयोजित केले होते. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. शाळेचे अध्यक्ष संदीप काकडे यांनी स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)