कृष्णराव भेगडे शाळेत द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

तळेगाव दाभाडे – येथील तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या वर्षातील द्वितीय सत्रातील पहिल्या दिवशी गुरुवारी (दि. 22) जल्लोषात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी विद्यार्थ्यांना या सत्रासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, शाळेचे अध्यक्ष डॉ. दिलीप भोगे व अन्य सर्व संस्थेच्या सभासदांनी विद्यार्थ्यांना या सत्रासाठी शुभेच्छा दिल्या.

-Ads-

प्रथम सत्रात घेतल्या गेलेल्या “वर्गसजावट’ स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात पहिली व दुसरी या गटात दुसरी “डेजी’ या वर्गाचा प्रथम क्रमांक, तिसरी व चौथी या गटात चौथीच्या “डेलिया’ या वर्गाचा प्रथम क्रमांक तर पाचवी ते दहावी गटात पाचवीच्या “ऑनिमोन’ या वर्गाचा प्रथम क्रमांक आला. या सर्व विद्यार्थ्यांना पेन देऊन गौरविण्यात आले. सुट्टीत आलेल्या “बालदिना’चे औचित्य साधून सर्व शाळा फुगे लावले. रांगोळ्यांनी सजवली होती. मजेशीर खेळ आणि शाळेच्या सभागृहात “तानी’ चित्रपट दाखवण्यात आला. सर्व मुलांना या चित्रपटाच्या माध्यमातून शिक्षणाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)