कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

तळेगाव दाभाडे – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या समारंभासाठी गतवर्षीचे सर्व विद्यार्थी उत्साहाने उपस्थित होते.

समारंभप्रसंगी संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, उपाध्यक्ष सुभाष दाभाडे, सचिव राजश्री म्हस्के, खजिनदार गौरी काकडे हे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सर्व उपस्थित पाहुण्यांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर गतवर्षी शाळेतून प्रथम आलेल्या प्रीतम आल्हाट, द्वितीय प्रणव गारे, तृतीय आदिल शेख यांचा भेटवस्तू व एक भेटकार्ड देऊन सत्कार करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तू व एक भेटकार्ड देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व्यक्‍त केली. त्यात आदिल शेख, प्रीतम आल्हाट, अथर्व कुलकर्णी, संस्कार चव्हाण यांनी आपापली मनोगते व्यक्‍त केली.

शिक्षकांनीही या विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शनपर मते व्यक्‍त केली. त्यात निशा थॉमस, पूजा पांडे, भूवना मेंगडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले. संस्थेचे संस्थापक संदीप काकडे यांनी मार्गदर्शनपर मनोगतात त्यांच्या पुढील भविष्यकाळासाठी विविध कार्यात सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिला गोसावी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अरूंधती डांगे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)