कृषी संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज– सुधीर मुनगंटीवार

मुंबई: शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीने शेती करताना शेती क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन होणे काळाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन  कृषी विद्यापीठांनी कृषिकेंद्रित संशोधनावर लक्ष केंद्रित करणे अगत्याचे असल्याचे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यामध्ये असे संशोधन उपयुक्त ठरणार असल्याने कृषी विद्यापीठात कृषी आधारित संशोधन केंद्र निर्माण करावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

क्रॉप केअर फांऊडेशन ऑफ इंडियाद्वारे आयोजित शेती अधिक किफायतशीर करण्यासाठी सरकारउद्योग आणि शेतकरी एकत्र काम करु  शकतात’ या विषयावरील एक दिवसीय परिषदेमध्ये मुनगंटीवार बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आज आयोजित करण्यात आलेली परिषद त्या दृष्टीने खूप महत्त्वाची असल्याचे सांगून परिषदेत या विषयावर होणारे चिंतन शेतकऱ्यांचा विकासासाठी, कृषी उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त सिद्ध होईल असा विश्वासही मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)