कृषी संजीवनी योजना ठरली फसवी

माहिती अधिकारातून उघड 


शासनाचा दावा फोल


वीज ग्राहक संघटनेने केला आरोप

पुणे- कृषि संजीवनी योजनेच्या माध्यमातून शेतीपंपाची वीज बिले कमी केल्याचा राज्य शासनाचा दावा फोल ठरल्याचे उघडकीस आले. शेतीपंपाची वीजबिले सरासरीच्या दुप्पट करुन त्यानंतर कृषि संजीवनी योजनेच्या माध्यमातून ही बिले कमी केल्याचे माहिती अधिकारातून निष्पन्न झाले आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्यावतीने माहिती मागविण्यात आली होती. त्यात राज्य सरकारने 52.3 टक्के थकबाकी कमी केल्याचे सांगितले. याचा अर्थ निम्याहून अधिक थकबाकी ही चुकीची दाखविली आहे. उदा. एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे बिल जर हजार रुपये येत असेल, तर ते दुप्पट दाखविण्यात आले आहे. म्हणजे, त्याठिकाणी दोन हजार करण्यात आले. त्यानंतर कृषि संजीवनी योजनेमार्फत वीजबिल कमी केल्याचे दाखवून हजार रुपये बिल शेतकऱ्यांकडून स्वीकारण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्यात जी वीज गळती होत आहे, तीसुद्धा शेतीपंपाचा वीज वापर वाढीव दाखवून लपविण्यात आली आहे, हे आकडेवारी वरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळेही योजना फसवी असल्याचा दावा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने करण्यात आला.

याशिवाय राज्यातील 41 लाख शेतकऱ्याच्या वीज बिलाची तपासणी करुन 31 मार्च 2018 अखेर पर्यत सर्व वीजबिले थकबाकीमुक्त करण्यात यावी, अशी मागणी ही करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)