कृषी विभागाच्या वतीने शेळ्यांचे वाटप

अवसरी- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने मागासवर्गीय शेतकऱ्यांना मोफत दोन शेळ्या आणि एक बोकड देण्यात आले आहे, अशी माहिती उपसरपंच सचिन हिंगे यांनी दिली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत मागासवर्गीय शेतकऱ्यांना शेळया, बोकड दिले जात आहे. या योजनेचा लाभ अवसरी बुद्रुक येथील शेतकरी संतोष मारुती रोकडे, अनिल बाळू रोकडे यांना मिळाला. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, सरपंच पवन हिले, सुनील हिंगे, ग्रामपंचायत सदस्या आशा चव्हाण, शीतल हिंगे, ललिता गायकवाड, वसुंधरा वाघमारे समवेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मागासवर्गीय शेतकऱ्यांना पंचाहत्तर टक्‍के अनुदानावर तर सर्वसाधारण शेतकऱ्यांना पन्नास टक्‍के अनुदानावर दहा शेळी व एक बोकड देण्यात येणार आहे. त्यासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन ग्रामपंचायत सदस्य प्रशांत वाडेकर केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)