कृषी विभागाच्या परवानगीनंतरच अवजारे खरेदी करा

भोर- कृषी विभागाने अधिकृत परवानगी दिल्यानंतरच शेतकऱ्यांनी आवजारे खरेदी करावीत, असे आवाहन भोर तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियाना अंतर्गत योजनेत भोर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे ट्रॅंकरसाठी प्राप्त झालेल्या 317 व पॉवर टिलर, भात कापनी यंत्र, भात मळणी, लावणी यंत्र, रोटाव्हेटर, पॉवर विडर, आदि औजारांसाठी प्राप्त झालेल्या 513 शेतकऱ्यांच्या अर्जांची शेतकऱ्यांच्याच हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत काढण्यात आली, त्यावेळी वडखेलकर बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब पलघडमल, भोर तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती लहूनाना शेलार, मंडलाधिकारी श्रीधर चिंचकर, राजेंद्र डोंबाळे, कृषी तंत्र व्यवस्थापक कणसे यांच्यासह तालुक्‍यातील शेतकरी उपस्थित होते. बाळासाहेब पलघडमल म्हणाले की, शेती उत्पादन वाढवण्यासाठी यांत्रिकी करणाने शेती करणे आवश्‍यक आहे. यंत्राद्वारे कमी श्रमात शेतकऱ्यांना शेतीची मशागत करता येऊन त्याचे उत्पादनातही भरघोस वाढ होते. सध्या राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून या योजनेसाठी शासन किती निधी उपलब्ध करुन देणार त्यावर या योजनेचा लाभ आवलंबून असला तरी जास्तीतजास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून पात्र शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर जानेवारी ते मार्च दरम्यान जमा केली जाईल असे आश्‍वास त्यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)