कृषी विद्यापीठात 23 जूनला कृषी शिक्षण दिन

कृषी विज्ञान, कृषी अभियांत्रिकीतील संधींवर चर्चा

प्रवेश प्रक्रियेवर मार्गदर्शन मिळणार

राहुरी विद्यापीठ – महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान महाविद्यालयात 23 जूनला कृषी शिक्षण दिनाचे आयोजन केले आहे.

कृषी विज्ञान आणि कृषी अभियांत्रिकीमध्ये असलेल्या विविध संधी या विषयी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि पालकांना तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कृषी अभियांत्रिकी शाखेमध्ये कृषी यंत्रे, कृषी प्रक्रिया, अभियांत्रिकी, जल आणि मृदा संधारण अभियांत्रिकी, जलसिंचन आणि निचरा अभियांत्रिकी, ग्रामीण विद्युतीकरण या विषयांचा समावेश होतो. करिअर विषयक संधी, प्रवेश घेण्यासाठी पात्रता, प्रवेश प्रक्रियेची माहिती, देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी यावर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

कार्यशाळेचा लाभ पालक, विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. डी. पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)