कृषी विद्यापीठांमधील कृषी तांत्रिक पदविका अभ्यासक्रम पूर्ववत

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पाठपुराव्याला यश
शिर्डी – राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बंद झालेला कृषी तांत्रिक पदविका अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने हा अभ्यासक्रम पूर्ववत करण्याबाबत शिक्कामोर्तब केले आहे.
प्रशासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार न करता हा अभ्यासक्रम बंद केला होता. एकीकडे सरकार कौशल्य विकासाचे ढोल बडवत असताना दुसरीकडे शेतीशी निगडित हा अभ्यासक्रम बंद झाल्याने विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणापासून वंचित रहावे लागणार होते.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विखे यांनी तातडीने तत्कालीन कृषिमंत्री स्व. पांडुरंग फुंडकर यांच्याशी संपर्क साधून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. या निर्णयामुळे होणारे प्रतिकूल परिणाम निदर्शनास आणून दिल्यानंतर फुंडकर यांनी हा अभ्यासक्रम पूर्ववत करण्याचे आश्‍वासनही दिले होते. मात्र, दुर्दैवाने त्यांचे अकाली निधन झाले.
त्यानंतर कृषी विभागाची जबाबदारी सोपवण्यात आलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे राधाकृष्ण विखे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. दरम्यान, असोसिएशन ऑफ ऍग्री ऍण्ड ऍग्रो अलाईड कॉलेजेस्‌ या संघटनेनेही मुंबई येथे कृषिमंत्र्यांची भेट घेऊन या निर्णयामुळे ग्रामीण भागावर होणाऱ्या परिणामांची माहिती दिली. अखेर राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठांमधील हा अभ्यासक्रम पूर्ववत करण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)