कृषी विज्ञान केंद्र हे जागतिक कृषी तंत्रज्ञान पोहचविणारे माध्यम

नारायणगाव-कृषी विज्ञान केंद्र हे कृषी तंत्रज्ञानाचे भांडार असून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गरजेनुसार आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविणारे केंद्र आहे, असे प्रतिपादन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक डॉ. ए. के. सिंग यांनी नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या भेटीदरम्यान केले.
यावेळी त्यांच्यासमवेत पुणे येथील कृषी तंत्रज्ञान व अवलोकन संस्था झोन 8चे संचालक डॉ. लाखन सिंग, कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रशांत शेटे व शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.
डॉ. ए. के सिंग म्हणाले, केंद्र सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात यावा. याकरिता पाणी व्यवस्थापन, पिकांच्या अवशेषांचा पुनर्वापर, संरक्षित शेती, उद्योजकता विकास, कौश्‍यल्य आधारित प्रशिक्षणे आदि योजनांचा एकत्रितरित्या अवलंब करून कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे यांनी मॉडेल व्हिलेज उभारावे. अगदी कमी कालावधीत या कृषी विज्ञान केंद्राने भरारी घेत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार केंद्राच्या प्रक्षेत्रावर राबविलेले प्रकल्प पथदर्शी ठरतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी डॉ. ए. के. सिंग, डॉ. लाखनसिंग यांनी केव्हीकेच्या प्रक्षेत्राला व विविध प्रकल्पांना भेट दिली. कृषिरत्न अनिल मेहेर यांनी केव्हीकेच्या आजपर्यंत उभारलेल्या प्रकल्पांची माहिती दिली व कम्युनिटी रेडिओ, फळबागा आणि शेळीपालनाच्या उत्कृष्ट उत्पादनासाठी गुणवत्ता केंद्राच्या उभारणी प्रकल्पाची मागणी केली.
यावेळी केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत शेटे यांनी केंद्राच्या कामकाजाचे सदरीकरण केले, तर सूत्रसंचालन कृषी विस्तार विषयतज्ञ राहुल घाडगे यांनी केले व मृदाशास्त्रज्ञ योगेश यादव यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)