कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांना आगळा सल्ला

उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शेती व्यतिरीक्त गुंतवणूक वाढवा
मथुरा – मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून देण्याच्या घोषणा वारंवार केल्या आहेत. पण त्या अनुषंगाने केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंग यांनी मात्र शेतकऱ्यांना शेतीत फार गुंतवणूक करण्याऐवजी पूरक उद्योगावर अधिक गुंतवणूक करण्याचा अजब सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांनी अन्य पुरक उद्योगांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्यांनी आपल्या भांडवलापैकी केवळ 40 टक्के गुंतवणूक शेतीत आणि उर्वरीत 60 टक्के गुंतवणूक पूरक उद्योगांत गुंतवली पाहिजे तरच त्यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते.

शेतकरी केवळ शेतीवरच अवलंबून राहिला तर त्याचे उत्पन्न कधीच दुप्पट होणार नाही. कृषी मालाचे उत्पादन हे मागणी पेक्षा अधिक असल्याने त्यातून शेतकऱ्यांना लाभ होणार नाही त्याऐवजी त्यांनी मधुमाशा पालन, दुग्ध उत्पादन, कुक्कुट पालन अशा क्षेत्राकडे वळले पाहिजे असे त्यांनी शेतकऱ्यांना सुचवले आहे. शेतकऱ्यांनी मासेपालन, शेळी पालन अशा पूरक उद्योगाकडे वळले पाहिजे त्याखेरीज त्यांचे उत्पादन वाढणार नाही.

विविध कारणांमुळे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही याची कबुलीही मंत्र्यांनी यावेळी दिली. कृषी वैज्ञानिकांनी शेतकऱ्यांना सहाय्य होईल असे संशोधन केले पाहिजे असे आवाहन करताना त्यांनी म्हटले आहे की आपल्या संशोधनामुळे दरवर्षी किमान दहा शेतकऱ्यांना तरी लाभ होईल याची काळजी वैज्ञानिकांनी घेतली पाहिजे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)