कृषी, पशुसंवर्धन क्षेत्रातील आव्हाने दूर होणार

बारामती/जळोची- नेदरलॅण्ड आणि भारताच्या संबंधाचा हा चांगला क्षण आहे. आम्ही एकत्र कामकरणार आहे. यासाठी झालेला परस्पर सामंजस्य करार कृषी क्षेत्रातील विशेषत: पशुसंवर्धन क्षेत्रातील आव्हाने दूर करण्यासाठी उपयोगी पडेल येथील भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये डच तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येईल, असे प्रतिपादन नेदरलॅण्डच्या उपपंतप्रधान कॅरोला स्काऊटेन यांनी केले.
“सेंटर फॉर एक्‍सलंस डेअरी’ या देशातील एकमेव प्रकल्प बारामतीत ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत माळेगाव (ता. बारामती) येथे उभारला जाणार असून त्याची आज (शुक्रवारी) पायाभरणी स्काऊटेन यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, नेदरलॅण्डच्या डी. कार्डोझो, एम. सोरेमा, व्हाऊटर वरे, रिक इवाग, जगदिश भट्टर, राजेंद्र पवार उपस्थित होते.
कॅरोला स्कऊटेन म्हणाल्या, भारतातील शेतकरी दूध व्यवसायात तंत्राचा कमी वापर करतात. त्यामुळे जास्त कष्ट करुनही शेती पूरक हा व्यवसाय तोट्यात जातो ही चिंतेची बाब आहे. मात्र, पशुधन अनुवंश सुधारणा गुणवत्ता केंद्र हा प्रकल्प शेतकरी हिताचा आहे. दुग्ध व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने शुद्ध, निरोगी दूध नागरिकांना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.
भारतीय शेतीला निर्यातीचे तंत्र व त्यासंबंधातील अधुनिक ज्ञान देण्यावर नेदरलॅण्डचा भर आहे. मी आज बारामती पाहिली, खूप प्रभावित झाले. बारामतीत शेतीच्या बाबतीत अद्ययावत शैक्षणिक केंद्र आहे. शेतकऱ्यांना खूप चांगले व नवे तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न येथे होतो हे कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न व एकरी उत्पादन वाढविण्यावरचा भर अत्यंत महत्त्वाचा आहे. नेदरलॅण्डच्या तंत्रज्ञानाचा वापर जर भारतातील शेतकऱ्यांना होणार असेल तर नेदरलॅण्ड सदैव पुढे असेल. या करारामुळे भारत-नेदरलॅण्डमध्ये नात्याची वीण घट्ट होईल आणि शेतकरी समृद्ध होईल, असा विश्‍वास उपपंतप्रधान स्कऊटेन यांनी व्यक्‍त केला. हा डेअरी प्रकल्प शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरेल. नेदरलॅण्ड व भारतातील तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीत शरद पवार यांनी मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

  • शेतामध्ये तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखवनु शेतकऱ्यांपर्यंत ते तंत्रज्ञान पोहोचविणे आवश्‍यक आहे. राज्यातील दूध उत्पादक प्रतिनिंधींनी दूध धंद्याच्या अडचणींबाबत नुकतीच चर्चा केली. त्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करण्यात येईल. चांगल्या दर्जाच्या गायी, म्हशींच्या पैदाशीसाठी प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल.
    – शरद पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)