कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार

नारायणगाव-महाराष्ट्र राज्यात सन 2018-19 पासून कृषी तंत्र निकेतन हा अभ्यासक्रम बंद करण्याबाबत विद्यापीठांनी कळविले आहे. कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रमात आलेल्या समस्येबाबत कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांची बैठक नुकतीच सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडली.
या बैठकीसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसाडिकर, कृषी सचिव विजय कुमार, संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, आमदार डॉ. सुधिर तांबे, माजी आमदार दिगंबर विसे, ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत घोगरे, दत्ता पानसरे, प्रभाकर चांदणे, अरविंद पोटे, ज्ञानदेव वाफारे, प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड, सोमनाथ काटकर, परांडकर, गोविंद साळुंके उपस्थित होते.
यावेळी विद्यापीठाचे पातळीवरून कृषी तंत्र निकेतन पदविका अभ्यासक्रम बंद करण्यासाठी केलेली शिफारस ही विद्यार्थी विरोधी आणि राज्याच्या कृषी विकासासाठी कशी घातक आहे, याबाबत संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. पाचव्या अधिष्ठाता समितीच्या अहवालामध्ये कृषी पदवी अभ्यासक्रम बदल करून तो जास्तीत जास्त व्यावसायिक करण्याबाबत समितीने सुधारित अभ्यासक्रम शिफारस केला आहे. त्याच आधारे कृषी तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम व्यावसायिक आणि सुधारित करावा, असे निवेदन कृषीरत्न अनिल मेहेर यांनी केले. विद्यापीठांकडून हा अभ्यासक्रम बंद करण्यात आल्याचा प्रस्ताव महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायदा 1983 च्या कलम 4 (ड) अंतर्गत कृषि मंत्री तथा प्रभारी कुलगुरू यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून स्थगित करावा आणि पुढील अभ्यासक्रम तयार होईपर्यंत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मुदतवाढ द्यावी. याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय करून विद्यापिठांना निर्देश देण्यात यावेत अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील आणि आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी यावेळी केली.
माजी कृषीमंत्री शरद पवार यांनीही या प्रश्नाबाबत कृषिमंत्री यांच्याशी बरोबर फोनवरून सविस्तर चर्चा केली असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी कृषी सचिव विजय कुमार यांनी या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी इतर राज्यात सुरु असलेल्या कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रमाच्या धर्तिवर निर्णय करण्याचे मान्य केले. याप्रसंगी बोलताना कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फटका बसणार असेल तर राज्य शासन याबाबत गंभीर आहे. कृषी तंत्र निकेतन हा सन 2012 पासून सुरू असणारा अभ्यासक्रम बंद करण्यात येणार नाही. तसेच विद्यापीठांनी अभ्यासक्रम बंद करण्याबाबत दिलेल्या पत्रानुसार कोणतेही संमतीपत्र सादर करण्याची आवश्‍यकता नसल्याचे प्रतिपादन केले. अभ्यासक्रम व प्रवेश याबाबत सुद्धा सकारात्मक विचार करुन निर्णय घेण्यात येईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या प्रश्नांबद्दल विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या संदर्भात निवेदन दिले असून हा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची जोरदार मागणी केली आहे. या बैठकीनंतर फुंडकर यांनी उपसचिव गावडे, शिक्षण संचालक डॉ. कौसाडीकर यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)