कृषी अधिकाऱ्यांकडून खत विक्री दुकानांवर छापे

कळंत्रेवाडी, काले येथे लाखो रुपयांचा खतसाठा जप्त

कराड – कराड तालुक्‍यातील कळंत्रेवाडी, काले याठिकाणी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी खत विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकत लाखो रुपयांचा खत साठा जप्त केला. तर काही ठिकाणचे साठा सील करण्यात आला असून त्याबाबत चौकशी सुरु असल्याचे कृषी अधिकाऱ्यांकडून सांगीतले जात आहे.

कराड तालुक्‍यातील कळंत्रेवाडी येथे गुरुवारी सायंकाळी छापा टाकून सुमारे 75 हजारांचा खतांचा साठा कृषी विभागाने जप्त केला. विनापरवाना खत विक्री केली जात असल्याची माहिती कृषिविभागास मिळताच पंचायत समितीचे कृषी विभागाचे अधिकारी हलकंदर यांच्यासह पथकाने याठिकाणी जावून छापा टाकला. व खताचा पंचनामा करुन तो साठा ताब्यात घेतला. जप्त केलेल्या खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले जाणार असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, तालुक्‍यातील काले येथील डाळिंबीची बाग परिसरात खते-टॉनिक, किटकनाशके विक्री करणाऱ्या दुकानावरही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत खत साठ्याची तपासणी करीत काही साठा सील करण्यात आला.
काले परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन खतांची तसेच शेतीपूरक टॉनिकची माहिती देऊन त्याची विक्री करण्याचे काम काही लोक करत होते.

परिसरातील काही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून खते व टॉनिक खरेदी केले होते. मात्र त्या शेतकऱ्यांनी संबंधित घटनेची माहिती शासनमान्य खत व किटकनाशके विक्रेत्यांना दिली होती. परिसरातील दुकानदारांनी याची चौकशी केली असता त्यांना यामध्ये काही तरी गडबड असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी तसेच उपविभागीय कृषी अधिकारी यांनी डाळिंबाची बाग येथे जावून सदर दुकानावर छापा टाकत संबंधीताची चौकशी सुरु केली. तेथील कागदपत्रांची तपासणी करत अधिकाऱ्यांनी खताचे नमुने तपासणीसाठी घेतले असून खते, किटकनाशके, टॉनिकचा साठा सील करण्यात आला. याची पुढील चौकशी कृषीअधिकारी करत असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)