कृषीसेवा पूर्व परीक्षेच्या उत्तरतालिका प्रसिद्ध

 

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. 20 मे 2018 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषिसेवा पूर्व परीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्‍नपत्रिकेच्या चारही संचाची उत्तरतालिका (अन्सर कीज्‌) उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या परीक्षेच्या उत्तरतालिकेतील प्रश्‍नोत्तरासंबंधी उमेदवारांना निवेदन करावयाची असल्यास, ती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या हरकतीच्या नमुन्यातच करावयाची आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हरकतीचा नमुना उपलब्ध आहे. आयोगाने विहित केलेल्या नमुन्यातच अर्ज केल्यास स्वीकारले जातील. अन्य कोणत्याही नमुन्यातील हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
उमेदवारांनी त्यांच्या हरकती परीक्षा नियंत्रक व सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सातवा मजला, कुपरेज हेलिफोन निगम इमारत, महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई या पत्त्यावर पाठवावीत. हरकती दि. 28 मेपर्यंत आयोगाकडे पोहोचलेल्या निवेदनांची दखल घेतली जाईल. त्यानंतर आलेल्या निवेदने विचारात घेतली जाणार नसल्याचे आयोगाकडून कळविण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)