कृषीसाठी असलेला निधी जास्तीत जास्त शतकऱ्यांपर्यंत पोहचवा – पांडुरंग फुंडकर

मुंबई – कृषी विभागासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. आयुक्तालयाने केलेल्या सादरीकरणात यावर्षी विभागाचा सुमारे 75 टक्के निधी खर्च झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.

शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांच्या कामांना गती देतानाच प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत निधी पोहोचला पाहिजे. वर्षभरात उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून शेतीचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असून गटशेतीला चालना मिळाली आहे. भविष्यात पीक संरक्षण आणि मृद आरोग्य पत्रिका वाटपाची मोहिम हाती घेण्याचे आवाहन कृषीमंत्र्यांनी यावेळी केले.

बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार, आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह उपस्थित होते.यावेळी कृषीमंत्र्यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्य पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतला. कृषी विभागासाठी आतापर्यंत 75 टक्के खर्च करण्यात आला असून केंद्र पुरस्कृत योजनांवर 83 टक्के इतका खर्च झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)