“कृषी’च्या विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिकावे : फरांदे

कराड – कृषी क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून जीवनात यशस्वी होण्याचे सूत्र अवलंबावे, असे प्रतिपादन राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी केले. कृषी विभागाच्या शिक्षण प्रतिमान अभ्यास क्रमातंर्गत उद्यानविद्या अनुभवावर आधारित शिक्षण प्रतिमानाच्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक फिल्म आच्छादन व ठिबक सिंचनाद्वारे तयार केलेल्या वाफ्यामध्ये “कोकोपीठ ट्रे’मध्ये तयार केलेल्या कलिंगड पिकांच्या शुगरक्वीन या जातीच्या रोपांच्या रोप लागणीचा कार्यक्रम येथील शासकीय कृषी महाविद्यालयात नुकताच झाला.

यावेळी डॉ. फरांदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभरणीचे माजी कुलगुरू डॉ. संतराम कदम, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, प्राध्यापक, सेवक, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमा दरम्यान 14 विद्यार्थ्यांनी 37 गुंठे क्षेत्रावर कलिंगडाच्या “शुगरक्वीन’ व टरबुजाच्या “कुंदन’ या जातीची लागवड प्लॅस्टिक फिल्म आच्छादन व ठिबक सिंचनाद्वारे केली आहे, अशी माहिती उद्यानविद्या विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. संग्राम धुमाळ यांनी दिली. डॉ. संतराम कदम यांनी कराडचे शासकीय कृषी महाविद्यालय हे भविष्यात कृषी ज्ञानाचे ऊर्जा केंद्र बनेल, असा विश्‍वास व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)