कृषीकन्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन कौतुकास्पद

उरुळी कांचन- उरुळी कांचन परिसरात बेबी कॉलवा वाहत असल्याने तसेच नवीन मुळा-मुठा कालवा वाहत असल्याने या भागातील जमिनी अतिशय क्षारयुक्त झाल्या आहेत. त्यामुळे पिक चांगले येत नाही. शेतीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय नाजूक झाली आहे. परंतु गेल्या 4 महिन्यांपासून कृषी विद्यालयाच्या मुली प्रत्येक शेतात जाऊन शेतकऱ्यांना माती परीक्षण, पिके घेताना कोणती खते तसेच औषधाची फवारणी करावीत? आदीबाबत मार्गदर्शन करतात हे कौतुकास्पद आहे, असे मत शिंदवणे येथील प्रगतीशील शेतकरी आणि संत यादव बाबा माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष मुकेश महाडिक यांनी केले.
शिंदवणे तालुका हवेली कृषी महाविद्यालय पुणे येथील विद्यापीठाच्या बागल निकिता, सुप्रीया भिसे, विमल धायगुडे, अमृता अहिवळे, सृष्टी धुमाळ, अनिया एलिझाबेय, प्रियश्री भंडारी यांसह विद्यार्थी शिंदवणे सारख्या डोंगराळ भागात दररोज शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)