केडगाव- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे यांच्या कृषीकन्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयातील शिक्षकांना सन्मानित केले. 5 सप्टेंबर हा दिवस भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा झाला. या निमित्ताने येथील कृषीकन्यांनी जवाहरलाल विद्यालयात जाऊन शिक्षक बंधू-भगिनींना सन्मानित केले. मागील काही दिवसांपासून या कृषीकन्या या ठिकाणी विविध उपक्रम साजरे करीत आहेत. त्यामध्ये वृक्षाची लागवड प्रभातफेरी जनजागृती शेतकऱ्यांना मार्गदर्शन यांचा समावेश आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्यांनी जवाहरलाल विद्यालयात प्राचार्य खाडे, मुकुंद भिसे आणि इतर शिक्षकांना सन्मानित केले. या कृषीकन्यांमध्ये अंकिता शिंदे, ऐश्वर्या मिड, निकिता परदेशी, पल्लवी पवार, कादंबरी साळवे, अनुराधा टापरे, सोनाली मीना यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)