कृषि विभागाने शेतकऱ्यांसाठी तत्पर रहावे

आमदार दत्तात्रण भरणे; दुष्काळी स्थितीमुळे आगमी हंगामातील नियोजन महत्त्वाचे

रेडा- दुष्काळाच्या पार्श्‍वभुमीवर पीक पाण्याचे नियोजन आणि कृषि विभागाची भूमिका महत्त्वाचे ठरणार आहे. याकरिता शेतकऱ्यांना त्या-त्यावेळी सहकार्य करण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात येतील. तसेच, शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्याकरिता अशा योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्याबाबतही, कृषि अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

इंदापुरातील दुष्काळी स्थितीत पीकपाण्याचा आढावा घेताना ते बोलत होते. सध्याची दुष्काळी स्थिती पाहता आगामी काळाती खरीप हंगामातील पीकांचे योग्य नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे. यासह अशा स्थितील तोंड कसे द्यावे, याबाबतही कृषि अधिकाऱ्यांचा सल्ला शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. खरीप आणि रब्बी हंगामात तसेच वर्षभरात शेतकऱ्यांकरिता शासनातर्फे विविध योजना आखल्या जातात. या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी, याकरिता ग्रामसभांतूनच याची माहिती देण्याचा उपक्रम कृषि विभागातर्फे आखण्यात आलेला आहे. परंतु, याकडे विभागाचे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

या उपक्रमात कृषि सहायक ते कृषि आयुक्तांपर्यंतचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभागी असणे गरजेचे आहे. कृषिदिंडी, कृषिदूत, कृषिकन्या यांच्यामार्फत कृषि योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्याचे उदिष्ट असताना याकडे दुर्लक्ष होते. सध्याच्या दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना योग्य सल्ला मिळणे गरजेचे आहे. याच कारणातून याबाबतचा आढावा सातत्याने घेतला जाणार असल्याचेही आमदार भरणे यांनी सांगितले.

तालुक्‍यातील कृषि समृद्धतेसाठी गावपातळी ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था आणि शेतकऱ्यांचे गट आदींचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे, त्यामुळे या सर्व घटकांना कृषि विभागाशी संलग्न ठेवण्याकामी प्रयत्न केले जाणार आहेत. कृषि विषयक स्थितीवर चर्चा करून शेतकऱ्यांची मतेही जाणून घेतल्यानंतर त्यांच्या अडचणी सोडविल्या जागेवरच सोडविल्या जाण्याबाबत संबंधीतांना सूचना केल्या जातील, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.

  • सध्याची दुष्काळी स्थिती तसेच पीकांची अवस्था आणि यातून शेतकरी अडचणीत आलेला असताना आगामी हंगामातील कृषि नियोजन योग्य पद्धतीने करण्याकरिता कृषि विभागाची मदत घेण्याकामी संबंधीत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या जातील.
    – दत्तात्रय भरणे, आमदार, इंदापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)