कृषिमंत्री असताना पवारांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी का मंजूर केल्या नाहीत ? – भंडारी

कोल्हापूर – भाजपा नेते माधव भंडारी यांनी शरद पवार  यांच्यावर  निशाणा साधला आहे. देशाचे कृषिमंत्री असताना शरद पवारांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी का मंजूर केल्या नाहीत ? असा सवाल माधव भंडारी यांनी पवारांना विचारला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

माधव भंडारी एका खाजगी कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी भंडारी यांनी पत्रकार परिषद घेऊन, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समाचार घेतला. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर करा म्हणणारे शरद पवार यांनी  स्वतः केंद्रीय कृषीमंत्री असताना स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर का केल्या नाहीत ? असा सवाल भंडारी यांनी उपस्थित केला.  तर ज्यांना पक्षाच्या चिन्हावर राज्यात एकही नगरसेवक आणि आमदार निवडून आणता आला नाही त्यांनी मोदींमुक्त महाराष्ट्राची घोषणा करण म्हणजे विनोद आहे असं म्हणत त्यांनी  राज ठाकरे यांच्यावर  टीका केलीय.भाजपा पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त 6 एप्रिल रोजी मुंबईत बी के सी कॅम्पेलक्सला  कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला असून, त्याला केंद्रीय पक्ष नेतृत्व उपस्थित राहणार असल्याचेही  त्यांनी यावेळी सांगितलं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)