कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत

मुंबई – पक्षाघाताच्या आजारामुळे अंथरुणाला खिळून राहिलेले कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांना वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांचे सहाय्य मंजूर केले आहे. दादाजी खोब्रागडे यांनी तांदळाचे विविध वाणांचा शोध लावला आहे.

नागभीड तालुक्‍यातील नांदेड (जि. चंद्रपूर) येथील दादाजी रामाजी खोब्रागडे हे सध्या पक्षाघाताने आजारी असून त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजूर केली आहे. मुंबई येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतून ही रक्कम चंद्रपूर शाखेत वर्ग करण्यात आली आहे. खोब्रागडे हे उपचार घेत असलेल्या रुग्णालयाच्या खात्यामध्ये आवश्‍यकतेनुसार ही रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनाकडून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

खोब्रागडे यांनी धानावर प्रयोग करीत विविध वाण विकसित केले आहेत. हे वाण प्रसिद्ध असून या कार्याबद्दल त्यांना निरनिराळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)