मंचर- भराडी (ता. आंबेगाव) येथे कृषीदूतांनी जनावरांचे लसीकरण केले, तसेच जनावरांचे खाद्य व्यवस्थापन, चारा प्रक्रियेविषयी माहिती देत जनावरांना कोणते खाद्य द्यावे, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आंबी-तळेगाव दाभाडे येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूताच्या पुढाकाराने शेती, पशुसंवर्धन, शेतीवर आधारित विविध व्यवसाय, शेती तंत्रज्ञानाविषयी वेगवेगळ्या विषयावर प्रात्यक्षिके आयोजित केली होती. कृषिदूतांच्या प्रयत्नातून लसीकरण आयोजित केले होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य खोब्रागडे, समन्वयक निंबाळकर, प्रा. जाधव , प्रा. खर्डेकर (पशुसंवर्धन व दुग्ध विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत अजयसिंह भाळे,सागर साखरे, श्रीराम बनकर, अक्षय मिसाळ, अक्षय चौधरी, ओंकार खंडागळे, पवनकुमार आणि डॉ. सुरेश टाव्हरे यांच्या प्रयत्नातून गाईंचे, म्हशींचे लसीकरण करण्यात आले. यावेळी कृषिदूतांनी जनावरांचे खाद्य व्यवस्थापन, चारा प्रक्रियेविषयी माहिती सांगितली. सोसायटीचे चेअरमन कैलास अरगडे, चेअरमन डॉ. पंढरीनाथ खिलारी, गणेश पवार, हरी अरगडे, बळीराम अरगडे, गणेश अरगडे, सागर अरगडे, महेश राजगुरू यांच्यासह शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)