लाखणगाव-आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील लाखणगाव येथे पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी येथील कृषिदुतांनी तब्बल दिडशे जनावरांना लसीकरण केले, अशी माहिती कृषीदुुतांनी दिली.
यावेळी जनावरांना पशुवैद्यकीय पी. आर. शिंदे, पशुधन विकास अधिकारी डॉ. मेहेत्रे व बी. डी. वाघोले यांनी घटसर्प, लाळ्या, खुरकूत या लशींचे जनावरांना लसीकरण केले. लसीकरणाच्या वेळी प्रा. सी. पी. खर्डेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य बी. वी खोब्रागडे, प्रा. एस. एस. निंबाळकर, प्रा. एस. एस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत प्रताप जाधव, शुभम शेटे, प्रीतम येवले, ऋषिकेश लांबी, राकेश रेड्डी, धनंजय रेड्डी, श्रीहर्ष यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)