कृषिदुतांच्या अनुभवाचा फायदा घ्या- पोखरकर

मंचर- आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील देवगाव येथे ग्रामीण कृषी कार्यानुभवासाठी आलेल्या कृषिदुतांचे स्वागत ग्रामस्थांनी केले. यावेळी सरपंच जयेश पोखरकर यांनी कृषिदुतांच्या अनुभवाचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. कृषी कार्यक्रमांतर्गत कार्यानुभवासाठी आलेल्या तळेगाव दाभाडे येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूत प्रवीण मेहत्रे, ईजाज शेख, जगदीशकुमार सिन्हा, तुषार खराडे, अबीद अली शेख आदिंचे स्वागत देवगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी स्वागत केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक खोब्रागडे, कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. निंबाळकर, कार्यक्रमाधिकारी शिंदे यांनी कृषी कार्यानुभवाविषयी माहिती सांगितली. यावेळी गावचे सरपंच जयेश पोखरकर, पोलीस पाटील प्रभाकर दाभाडे, माजी सरपंच निलेश खांडगे, तंटामुक्‍ती अध्यक्ष पोपट पोखरकर, सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य दिलीप खांडगे, शरद दाभाडे, बाळू खळे, मंगेश दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)