कृपाशंकर सिंह यांना क्‍लीन चीट

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कुटुंबियांनाही एसीबीचा दिलासा
मुंबई – बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी तपास यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे निर्दोष मुक्तता झालेल्या कॉंग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयानेही त्यांच्या कुटुंबियांनाही मोठा दिलासा दिला. कृपाशंकर सिंह यांची पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र मोहन, मुलगी सुनिता, जावई विजय सिंह आणि सून अंकिता या सर्वांना सत्र न्यायालयाच्या लाचलूचपत प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधिश डी. के. गुडाधे यांनी या खटल्यातून दोषमुक्त केले. या खटल्यात यापूर्वीच न्यायालयाने दोषमुक्‍त केलेले असल्याने त्यांच्या कुटूंबियांविरोधातही खटला दाखल होत नसल्याचे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.

बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करून सात वर्षांपूर्वी 2010मध्ये संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंह, त्यांची पत्नी मालती देवी, मुलगा नरेंद्र, मुलगी सुनिता, जावई विजय प्रताप यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटूंबीयांची सुमारे 274 कोटी बेहिशेबी मालमत्ता तसेच कृपाशंकर सिंह आणि त्यांचा मुलगा नरेंद्र यांनी रियल इस्टेटमध्ये सुमारे 148 कोटी रूपयाची मालमत्ता असल्याचा आरोप केला होता. याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2012 मध्ये लाचलूचपत प्रतिबंधकविभागाला सिंह आणि त्यांच्या कुटूंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याचे आदेश दिल होते.

त्यानंतर तीन वर्षे चौकशी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या सर्वांविरोधात सुमारे 5 हजार पानाचे आरोपपत्रात न्यायालयात सादर केले. त्यात प्रामुख्याने गैरमार्गाने बेहिशेबी मालमत्ता जमा करण्यासाठी कटकारस्थान केल्याच्या भादवि कलम 120 (बी)सह खोटी कागदपत्रे सादर करणे, 471 गुन्हा करण्यास प्रोत्सहन देण्यासह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अन्वये लोकसेवकाच्या माध्यमातून स्वत:साठी अथवा दुसऱ्यामार्फत मौल्यवान वस्तू अथवा लाच घेणे (कलम 13(1)बी, 13(1)डी,13(1)इ सह कलम 13 (2)) आदी कलमांचा समावेश होता.
दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी कृपाशंकर सिंग हे लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी एसीबीने सरकारची परवानगी न घेतल्याने न्यायालयाने या खटल्यातून दोषमुक्त केले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांविरोधातही खटला दाखल होत नाही, असा निर्वाळा न्यायालयाने देऊन या सर्वांना दोषमुक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)