‘कृतांत’चा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित

‘रेनरोज फिल्म्स’अंतर्गत निर्माते मिहीर शाह यांची निर्मिती असलेला ‘कृतांत’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वा सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. अभिनेते संदिप कुलकर्णा यांच्या हटके लूकची यावेळी बरीच चर्चा झाली होती. आता ‘कृतांत’चा मोशन टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘रेनरोज फिल्म्स’अंतर्गत निर्माते मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या ‘कृतांत’चं दिग्दर्शन दत्ता मोहन भंडारे यांनी केलं आहे. दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. ‘कृतांत’चं कथानक आजच्या लाइफस्टाइलवर आधारित आहे. भंडारे यांनी या चित्रपटात वर्तमान काळातील दैनंदिन जीवनाची सांगड जगण्याच्या तत्त्वज्ञानाशी घालत एक अनोखी कथा सादर केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आजच्या धावपळीच्या व्यावहारिक जीवनातील तात्विकतेचा संबंध अधोरेखित करण्यात आला आहे.

संदिपच्या जोडीला या सिनेमात सुयोग गो-हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन यांच्या भूमिका आहे. विजय मिश्रा या सिनेमाचे सिनेमॅटोग्राफर आहेत. संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी या सिनेमातील गीतांना संगीत दिलं आहे. दत्ताराम लोंढे या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)