कृतज्ञता व्यक्‍त करीत विद्याथिर्नीनी सैनिकांना बांधल्या राख्या

पवनानगर – देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्‍त केली. पवनानगर ब्राम्हणोली येथे शिबिरासाठी आलेल्या लष्करी जवानांना राख्या बांधून पवना विद्यालयाच्या विद्यार्थींनींनी रक्षाबंधन सण सोमवारी (दि. २७) साजरा केला.

विद्यार्थींनी तयार केलेल्या भेटकार्ड व स्वत: तयार केलेल्या राख्या सैनिकांना बांधण्यात आल्या. शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्‍तीपर गीते सादर करण्यात आली. या वेळी मेजर निरजकुमार, सुभेदार महेश सावंत, मेजर घनश्‍याम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना अल्पोपहार देखील लष्कराच्या वतीने वाटप करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी पवना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रीती जंगले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अध्यापक पांडुरंग ठाकर, सुनील बोरुडे, संजय हुलावळे, राजकुमार वरघडे, पल्लवी दुश्‍मण, अलका आडकर, नेहा भेगडे, गणेश साठे यांनी उपक्रमाचे संयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)