बेल्हे- श्री संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांची इंदापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कुसाळकर यांनी दिली.
बोरी बुद्रक (ता. जुन्नर) येथील श्री संभाजी विद्यालयात जिल्हा क्रीडा परिषद पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे यांच्या वतीने तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्‌घाटन पंचायत समितीच्या सदस्या अनघा घोडके, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे संचालक विलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष ढमाले उपस्थित होते. या स्पर्धेतील विद्यालयाचे विजयी खेळाडू पुढील प्रमाणे – 14 वर्षे मुली 1) माधवी राऊत 33 किलो प्रथम, 2)अनुष्का अवचार 39 किलो प्रथम, 3) समीक्षा पटाडे 50 किलो प्रथम, 4) ऋतुजा औटी 54 किलो प्रथम, 5) दीक्षा प्रधान 58 किलो प्रथम, 6) वैष्णवी जाधव 62 किलो गटात प्रथम क्रमांक आला. तर 17 वर्षे मुलीच्या गटात 1) शिवकन्या भंडागे 46 किलो प्रथम, 2) तृप्ती भोसले 49 किलो प्रथम, 3) प्रांजल जाधव 65 किलो गटात प्रथम क्रमांक आला. 17 वर्षे मुलांच्या गटात 1) सुनील फुलमाळी 48 किलो प्रथम, 2) सुयश शिंदे 80 किलो या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला. या सर्व खेळाडू विद्यार्थांची इंदापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेचे पंच म्हणून सचिन मुंढे, सुरेश काकडे, भाऊ पाबळे, दत्ता गावडे यांनी काम पाहिले. या खेळाडूंना विलास कदम, यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण लोहकरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)