मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी बुद्रूक येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील चार विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांची बारामती येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य रमेश हळदे यांनी दिली.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका क्रीडा संकुल मंचर येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 17 वर्ष वयोगटात गणेश रामदास चव्हाण, संकेत आबाजी लोंढे यांनी प्रथम नंबर मिळविला आहे. 19 वर्षे वयोगटात प्रज्वल नवनाथ हिंगे प्रथम नंबर मिळवत विजय संपादन केला. या खेळांडूना क्रीडा शिक्षक अंकुश टाव्हरे, प्रविण हिंगे, सुषमा हिंगे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विजयी खेळाडू व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष विष्णू हिंगे, कार्याध्यक्ष गणपत हिंगे, सचिव वसंत हिंगे, संचालक तसेच पर्यवेक्षक जगन्नाथ सुपेकर यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)