कुस्ती स्पर्धेत भिडले 140 मल्ल

मंचर-मंचर क्रीडा संकुल येथे झालेल्या आंबेगाव तालुका शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कुस्ती स्पर्धेत 140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, अशी माहिती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कुस्तीगीर राजेंद्र पाबळे यांनी दिली.
स्पर्धेचे उद्‌घाटन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कुस्ती स्पर्धेत तालुक्‍यातील विविध शाळांमधील 140 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी नवांदे सर, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कुस्तीगीर राजेंद्र पाबळे, विविध शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रीय कुस्ती पंच जयवंत गाडे व शरद गाडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. क्रीडा शिक्षक रामकृष्ण राजगुरु, जाधव सर, खानदेशे सर व हांडे सर यांनी स्पर्धेचे नियोजन केले. स्पर्धेचा निकाल-14 वर्षे वयोगटातील मुली प्रथम क्रमांक- संचिता रोकडे-संत ज्ञानेश्‍वर विद्यालय चास, जानकी देशमुख-शासकीय आश्रमशाळा पेठ, प्रिती जैद-नवखंड विद्यालय पारगांव खेड, साक्षी वालकोळी-शासकीय आश्रमशाळा पेठ, पायल शेवाळे-संगमेश्‍वर विद्यालय पारगाव. 17 वर्षे वयोगटातील प्रथम क्रमांक- सिद्धी गाडे-हुतात्मा बाबू गेणू विद्यालय महाळुंगे पडवळ, प्रज्ञा वाजे-शासकीय आश्रमशाळा घोडेगाव, आश्‍विनी ठोकड-शासकीय आश्रमशाळा घोडेगाव, तन्वी भालेराव-कमलजादेवी विद्यालय कळंब, निकीता पडवळ-हुतात्मा बाबू गेणू विद्यालय महाळुंगे पडवळ, पूजा शिंदे-कमलजादेवी विद्यालय कळंब. 14 वर्षे वयोगटातील मुले प्रथम क्रमांक-धनेश जाधव-नवखंड विद्यालय पारगांव-खेड, अविनाश डोंगरे-शरदचंद्रजी विद्यालय डिंभे. 17 वर्षे वयोगट प्रथम- साहिल बारवे-संत ज्ञानेश्‍वर विद्यालय चास, गणेश चव्हाण-विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक, आदित्य रायकर-संत ज्ञानेश्‍वर विद्यालय चास, संकेत लोंढे-विद्या विकास मंदिर अवसरी बुद्रुक, समीर टेमगिरे-अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर, अतुल पिंगळे-जनता विद्यालय घोडेगाव. 17 वर्षे वयोगट प्रथम क्रमांक-अविनाश वालकोळी-भिमाशंकर विद्यालय शिनोली, सनी दशरथ भोर-संत ज्ञानेश्‍वर विद्यालय चास, राम रावसाहेब आव्हाड-संत ज्ञानेश्‍वर विद्यालय चास, रोहित पारधी, तुषार बोऱ्हाडे भिमाशंकर विद्यालय शिनोली, विलास आव्हाड-जनता विद्या मंदिर घोडेगाव.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)