कुस्ती स्पर्धेत निर्मिती मुऱ्हे प्रथम

चिंबळी- पिपंरी चिंचवड महापालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने राजा शिवछत्रपती कुस्ती संकुल आकृर्डी येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कुरूळी (मुऱ्हेवस्ती) येथील निर्मिती नारायण मुऱ्हे या विद्यार्थीनीनी 36 किलो वजन गटात प्रथम नंबर मिळविला आहे. गणेश काबंळे यांनी तिला मार्गदर्शन केले. नुकतेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर राहुल जाधव, क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, आयुक्त श्रावण हार्डीकर, कुरूळीचे माजी उपसंरपच आशिष मुऱ्हे, मारूती मुऱ्हे, नितीन गायकवाड, अमित मुऱ्हे, बाळासाहेब बांगडे, संदेश गायकवाड व सतीश मुऱ्हे यांनी निर्मिती मुऱ्हेचे अभिनंदन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)