कुस्ती संघासाठी मंगळवारी निवड चाचणी

पुणे – वाशिम येथे येत्या 28 ते 30 मे या कालावधीत होणाऱ्या आगामी राज्यस्तरीय स्व. खाशाबा जाधव युवा फ्रीस्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेसाठी पुणे शहर संघाच्या निवड चाचणीचे आयोजन येत्या मंगळवार, दिनांक 23 मे रोजी राष्ट्रीय तालीम संघ, पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ येथे मंगळवारी सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळात निवड चाचणी घेण्यात येणार आहे. ही निवड चाचणी 50 किलो. 55 किलो, 60 किलो, 66 किलो, 74 किलो, 84 किलो व 96 किलो, तसेच 96 ते 120 किलो या गटांसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजी बुचडे यांनी दिली आहे.
निवड चाचणीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पैलवानांनी येताना आधार कार्ड, जन्मतारखेचा दाखला (मूळ प्रत) आणि छायाचित्र आपल्यासोबत आणावेत. या निवड चाचणीत एक जानेवारी 1997 ते 31 डिसेंबर 1999 या कालावधीत जन्म झालेल्या पैलवानांना सहभागी होता येणार आहे. शङरातील युवा पैलवानांनी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी दामोदर टकले (मोबा. क्र. 8657050990) किंवा शिवाजी बुचडे (मोबा. क्र. 9881041098) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धकांची वजने सोमवार दि. 22 मे रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळात होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)