कुस्तीचे मैदान मारणाऱ्या कामगाराच्या पाठीवर कौतुकाची थाप

– महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे पै सुरेश कदम यांना मानपत्र प्रदान

पिंपरी – भोर येथे रामनवमीनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत 68 किलो वजनी गटात टाटा मोटर्स कंपनीतील माथाडी कामगार पै सुरेश कदम यांनी चांदीची गदा पटकावली. या यशाबद्दल महाराष्ट्र मजदूर संघटनेकडून मानपत्र व रोख रक्कम देवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

महाराष्ट्र मजदूर कामगार संघटनेच्या शाहुनगर येथील कार्यालयात अध्यक्ष इरफान सय्यद यांच्या हस्ते पै. सुरेश कदम यांचा मानपत्र व रोख रक्कम 56 हजार रूपये देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष किसन बावकर, खंडू गवळी, आप्पा मुजुमले, मुरलीधर कदम, सचिव प्रवीण जाधव, सहसचिव सर्जेराव कचरे, श्रीकांत मोरे, राहुल कोल्हटकर, सतिश कांठाले, अशोक साळुंके, मारुती चौधरी, प्रभाकर गुरव, ओंकार माने, नागेश व्हनवटे, समर्थ नाईकवडे, बबन काळे, नितीन धोत्रे, प्रदीप धामणकर आदी उपस्थित होते. या सत्काराने सुरेश कदम भारावले होते.

इरफान सय्यद म्हणाले की, पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सांगतात. या विचारानुसारच जगाचे ओझे कष्टकरी माथाडी स्वतःच्या पोटासाठी माथ्यावर वाहत आहे. अशाही परिस्थिती आपल्यातील उपजत कलागुण जपत प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर पै सुरेश कदम यांनी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून सर्व माथाडी कामगारापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. माथाडी कामगारांमधील कलागुणांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी संघटनेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आपल्यातील उपजत गुण ओळखून माथाडी कामगारांनी स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

बाळासाहेब शिंदे म्हणाले की, माथाडी कामगाराचे दैवत कै. अण्णासाहेब पाटील यांना कुस्ती या खेळाविषयी विशेष प्रेम होते. म्हणूनच ते नेहमी कुस्तीपट्टू माथाडी कामगार यांच्या पाठीशी सदैव उभे असायचे. त्यांचा आदर्श ठेवून कामगार नेते इरफान सय्यद यांची वाटचाल सुरु आहे. त्यामुळेच माथाडी काम करता करता पैलवानकी करणाऱ्या सुरेश कदम यांच्या पाठिशी महाराष्ट्र मजदूर कामगार संघटना उभी राहिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माथाडी मंडळातील टोळी क्रमांक 17 व टोळी क्रमांक 495 मधील कामगारांनी पुढाकार घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)