कुसेगाव येथे जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन

कुरकुंभ – कुसेगाव (ता. दौंड) येथे सोमवारी (दि. 28) रात्री आठच्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. वारे इतके जोराचे होते की बऱ्याच घरांचे यामध्ये नुकसान झाले. स्मशानभूमीजवळील एका दुकानाची टपरी अक्षरश उडून रस्त्यावर येऊन पडली. यावेळी केवळ योगायोगाने रस्त्याने जाणारा दुचाकीस्वार बचावला. यावेळी लाईट खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. काही ठिकाणी मुळासकट झाडे उन्मळून खाली पडली होती, तर परिसरातील काही ठिकाणी विजेच्या तारा खाली लोंबत होत्या. सोमवारी (दि. 28) दिवसभर कडक तापमान होते. उन्हामुळे वातावरण असह्य झाले होते; पण संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते; पण ज्या शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांची मात्र निराशा झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)