कुसेगाव परिसरातील बंधारे कोरडे पडण्यास सुरुवात

File photo

कुरकुंभ- कुसेगाव (ता. दौंड) परिसरातील बंधारे हे कोरडे पडू लागले आहेत. हे बंधारे पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मागील पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने विजयवाडी तलाव हा तब्बल सात-आठ वर्षांनी भरून वाहिला होता. या भरून वाहणाऱ्या पाण्यावर कुसेगाव परिसरातील बंधारे अवलंबून आहेत. त्यामुळे हे बंधारे पूर्ण क्षमतेने भरले होते; पण विजयवाडी तळ्यातील पाण्याची क्षमता कमी झाल्याने हे बंधारे कोरडे पडू लागले आहे.
माजी सरपंच मनोज फडतरे यांच्या काळात झालेल्या जलयुक्‍त शिवार कामांमुळे ओढ्यावर बंधारे बांधण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंधारे भरून वाहत होते. पण उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हे बंधारे कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. या बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात शेती बरोबर गुरे जनावरे तसेच वन्य प्राण्यांना याचा मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी वापर होत. तसेच निसर्गातील पक्षी आपली तहान भागवण्यासाठी व अन्न शोधण्यासाठी या बंधाऱ्यानाचा फायदा होतो. मात्र हे बंधारे कोरडे पडू लागले असल्याने येणाऱ्या काही दिवसात बंधारे कोरडे पडणार आहेत.त्यामुळे परिसरातील शेतीच्या पाण्याची टंचाई येण्याऱ्या कडक उन्हाळ्यात जाणवणार असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तसेच या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात वन्यजीव त्यामध्ये चिंकारा हरीण, मोर, लांढोर, ससे, कोल्हे, लांडगे हे प्राणी व पक्षी पाण्याच्या व अन्नच्या शोधात येत असून ते पक्षांना अन्न म्हणून मासे या बंधाऱ्यावरील ओढ्यांवर सहज उपलब्ध होत होते. येणाऱ्या उन्हाळ्यात वन्य जीवांना वणवण भटकंती करावी लागणार असल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
सध्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विजयवाडी तलावाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात कमी झालेली असल्यामुळे कुसेगाव पाणी पुरवठा अध्यक्ष मनेश शितोळे व कुसेगावच्या विद्यमान सरपंच प्रियंका विनोद शितोळे यांनी तलाव परिसरात जाऊन पाहणी केली व तलावातील पाणी पातळी दहा ते पंधरा दिवसात तळाला जाईल, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे या बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)