कुरकुंभ- कुसेगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती उत्साहात साजरी करून अभिवादन केले. सकाळी 9 वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच प्रियंका विनोद शितोळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच गावामध्ये निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण कुसेगावचे पोलीस पाटील गणेश शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गावातील समाज मंदिरामध्ये येऊन तेथील प्रतिमेचे पूजन गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा कार्यकर्ते अनिकेत गायकवाड यांनी केले.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक विजयसिंह शितोळे यांनी जगातील सर्वोत्कृष्ट संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब हेच आहेत, असे सांगितले. त्यांनी समाजातील मुलांना आंबेडकरांनी दिलेल्या “शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या मूलमंत्राचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नाना गायकवाड यांनी डॉ. आंबेडकरांचा जीवनपट वियषी माहिती दिली. तसेच तंटामुक्ती उपाध्यक्ष अर्जुन शितोळे, संजय लक्ष्मण गायकवाड, प्रवीण कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. कुसेगावच्या विद्यमान सरपंच प्रियंका विनोद शितोळे, उपसरपंच अलका गायकवाड, माजी सरपंच मनोज फडतरे, मोहन मोरे, मानसिंग काका शितोळे, दादासाहेब शितोळे, रमेश भोसले, दीपक गायकवाड, नारायण शितोळे, किरण गायकवाड, दिलीप शितोळे, मधुकर शितोळे, उमेश गायकवाड, कुंडलिक खोमणे, जनार्धन चव्हाण, सचिन कोकाटे, तात्याबा गायकवाड, कृष्णा गायकवाड, अशोक गायकवाड, धनराज गायकवाड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)