कुसगावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी रामदास हगवणे

कुसगाव ः रामदास हगवणे यांचा सत्कार करताना आ. मकरंद पाटील.

वाई, दि. 28 (प्रतिनिधी)- कुंसगाव, ता. वाई येथे झालेल्या ग्रामसभेत रामदास हगवणे यांची एकमताने गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. तर नारायण वरे यांची कृषी मित्र म्हणून निवड करण्यात आली. यावेळी सरपंच शामराव गाढवे, उपसरपंच जितेंद्र गोळे, माजी सरपंच विनायक वाडकर, महादेव वरे, गणपत वरे, यांच्यासह सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तंटामुक्ती अध्यक्ष रामदास हगवणे व नारायण वरे यांचा ग्रामस्थांच्यावतीने व आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवाडीमुळे गावातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
नवनिर्वाचित तंटामुक्तीचे अध्यक्ष रामदास हगवणे म्हणाले, तटामुक्ती समितीमधील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन व गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्सव व लग्नातील वरातीमधील डॉल्बी बंदीचा प्रयत्न करणार आहे. तसेच मुलांना विविध खेळांच्या सरावासाठी प्रोत्साहित करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)