कुष्ठरोग पुनर्वसन केंद्रात मिष्ठान्न भोजन वाटप

आळंदी- येथील खेड तालुका भाजपा कार्यकारणी सदस्य भगवान किसनराव लेंडघर यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणे साजारा केला. त्यांनी आनंदग्राम सोसायटीतील कुष्ठरोग पुनर्वसन केंद्रात तेथील 20ते 25 कुष्ठरोगी यांना मिष्ठान्न भोजनाचे वाटप केले. दम्यान पहाटे माऊलींना जलाभिषेक घालून, महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सध्या वाढदिवसाचा थाट काही वेगळाच आहे. कोणी भर चौकात वाहतुकीस अडथळा निर्माण करुन तलवारीने केक कापण्याची अघोरी प्रथा रुढ होत आहे. तर अनेकांनी फ्लेक्‍सबाजी करीत डिजेच्या दनदनाटात, फटाक्‍यांची आतषबाजी व जेवणावळीसाठी वारेमाप खर्च करुन आपला वाढदिवसावर अवाढव्य खर्च करीत आहेत. मात्र, भगवान लेंडघर यांनी अवाढव्य खर्चाला फाटा देत आर्शपदद्धतीने वाढदिवस साजराकरून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)