कुष्ठरोगींच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून विविध आदेश जारी

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने कुष्ठरोगींच्या हितासाठी विविध आदेश जारी केले. कुष्ठरोगींना आरक्षण आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी अपंगत्व प्रमाणपत्र जारी करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र नियम बनवण्याचा विचार केंद्र सरकारने करावा, असे न्यायालयाने नमूद केले.

कुष्ठरोगींसाठी अन्न अधिकारी निश्‍चिती व्हावी. त्यासाठी अंत्योदय अन्न योजनेचे लाभ मिळवण्यासाठी त्यांना दारिद्य्ररेषेखालील लोकांना दिले जाणारे कार्ड उपलब्ध करण्याकडे लक्ष दिले जावे. कुष्ठरोगींबाबत केंद्र आणि राज्य सरकारांनी व्यापक जनजागृती मोहीम हाती घ्यावी. कौटूंबिक सदस्य किंवा समाजापासून कुष्ठरोगींना वेगळे केले जाऊ नये. त्यांना विशेष रूग्णालयात पाठवण्याची गरज नाही, हे जनतेपर्यंत पोहचवले जावे.

कुष्ठरोगी सामान्य वैवाहिक आयुष्य जगू शकतात. अपत्यप्राप्तीचे समाधान ते घेऊ शकतात. सामाजिक कार्यक्रमांत ते सहभागी होऊ शकतात. तसेच, शाळांमध्ये जाणे, कामासाठी जाणे अशी साधारण कार्येही करू शकतात, याची माहिती जनजागृती मोहिमेद्वारे दिली जावी. कुष्ठरोगाबाबत योग्य माहिती पोहचण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात त्याविषयीचे शिक्षण देण्याबाबत विचार करावा, असेही न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)