कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी पाऊल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 4 नवीन अभ्यासक्रम

पुणे – राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त केलेल्या “आयुका’, “सी-डॅक’, “एनसीसीएस’ यांसारख्या नामवंत संशोधन संस्था (रिसर्च इन्स्टिट्यूट) विद्यापीठात आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी या संशोधन संस्थांच्या विद्यमाने येत्या शैक्षणिक वर्षात 4 नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. याची घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मंगळवारी केली. तसेच, विद्यापीठाच्या तीन विभागांत बीएस.स्सी. ब्लेंडेड हा पदवीस्तरावरील अभ्यासक्रमही सुरू करण्यात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“आयुका’, “सी-डॅक’, “एनसीसीएस’ यासारख्या संस्थांच्या मदतीने कुशल मनुष्यबळ निर्माण होण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. बी.एस्सी. ब्लेंडेड अभ्यासक्रमही उपयुक्‍त ठरत आहेत. अशा चारही अभ्यासक्रम येत्या जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमताही निश्‍चित करण्यात आल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

डेटा सायन्स डिप्लोमा
जगात डेटा सायन्सचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरीच्या मोठ्या संधी डेटा सायन्समध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे नव्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी डेटा सायन्समध्ये डिप्लोमा आणि सर्टिफिकेट अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या कोर्ससाठी “सी-डॅक’ची मदत घेण्यात येणार आहे. परमसंगणकाचा वापर करुन हा अभ्यासक्रम सुरू होईल. पुणे विद्यापीठ, सी-डॅक आणि सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन डेटा सायन्सेस यांच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम लवकर सुरू करण्यात येणार आहेत.

“आयुका’ मदतीने “मास्टर्स इन अॅस्ट्रोफिजिक्‍स’

इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्‍स अर्थात “आयुका’च्या महत्त्वाकांक्षी लायगो इंडिया प्रकल्पासाठी कुशल मनुष्यबळ देण्यासाठी विद्यापीठाने येत्या शैक्षणिक वर्षापासून “मास्टर्स इन अॅस्ट्रोफिजिक्‍स’ अभ्यासक्रम सुरू करणार आहे. पदव्युस्तर स्तरावरील हा अभ्यासक्रम असून, त्यासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमताही निश्‍चित करण्यात आली आहे.

“एनसीसीएस’द्वारे “मास्टर्स इन अॅस्ट्रोबायोलॉजी’
बहुचर्चित मंगळावरील मोहिमेसोबतच (मार्स) इतर मोहिमांसाठी संशोधक तयार करण्याच्या हेतूने विद्यापीठातील नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (एनसीसीएस) व विद्यापीठ यांच्यावतीने “मास्टर्स इन अॅस्ट्रोबायोलॉजी’ अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा आहे. केंद्र सरकार मंगळ मोहिम राबवत आहे. या मोहिमेद्वारे मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास आणि संशोधन करण्यात येणार आहे. त्यासाठी कुशल अभ्यासक आणि संशोधक लागणार आहे. याशिवाय देशात अनेक ठिकाणी जीवसृष्टीबाबत विविध संशोधन सुरू आहे. या सर्वांसाठी चांगले अभ्यासक देण्यासाठी विद्यापीठाने “मास्टर्स इन अॅस्ट्रोबायोलॉजी’ हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीएस.स्सी. ब्लेंडेड कोर्स सुरू करणार
पुणे विद्यापीठाने आयसर आणि युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न यांच्या सहकार्यातून गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयात नवीन ब्लेंडेड अभ्यासक्रम सुरू केला होता. हाच अभ्यासक्रम पर्यावरणशास्त्र विभागात यापूर्वीच सुरू करण्यात आला. आता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थसायन्स विभागात बीएस.स्सी. ब्लेंडेड कोर्स हा बी.व्होक. अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)